दुसऱ्या प्रसूतीत मुलगी जन्म झाल्यास लाभार्थ्यांना एकाच टप्प्यात सहा हजार

पात्र मातांसाठी आरोग्य विभाग मिशन मोडवर
दुसऱ्या प्रसूतीत मुलगी जन्म झाल्यास लाभार्थ्यांना एकाच टप्प्यात सहा हजार
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : मुलीचा जन्मदर वाढीस प्रोत्साहन

गडचिरोली,दि.11: केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या पुढाकारातून प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास 6 हजारांचा लाभ देण्याचे धोरण ठविण्यात आले असुन हा लाभ दिनांक 01 एप्रिल 2022 रोजी किंवा यांनतर जन्मलेल्या दुसरे अपत्य मुलगीसाठीच लागु असेल. या सुधारीत धोरणानुसार जिल्हयातील दिनांक 01 एप्रिल 2022 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत दुसऱ्या अपत्यात जन्म झालेल्या मुलींच्या मातांना लाभ देण्याचे धोरण हाती घेतले. दिनांक 31 ऑगस्टपर्यंत मागील आर्थिक वर्षातील सर्व पात्र पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी नियोजन करावे असे निर्देश गडचिरोली जिल्हातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकिय अधिकाऱ्यांना मा आयुषी सिंह ,मुख्य कार्यकारी अधिकारी,जि प गडचिरोली यांनी दिले आहेत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत गरोदर मातांना पहिल्या प्रसूती दरम्यान 5 हजारांचे अनुदान देण्यात येते. पण दुसऱ्या प्रसुतीनंतर त्यांना जर दुसरी मुलगी जन्माला आली तर सदरील स्तनदा मातेस 6 हजारांचे अनुदान एकाच टप्प्यात मुलीचे 3 रे लसीकरण पुर्ण झाल्यावर देण्यात येत असल्याचे डॉ.दावल साळवे ,जिल्हा आरोग्य अधिकारी, जि प गडचिरोली यांनी कळविले. योजने अंतर्गत प्रथम खेपेच्या गरोदर मातांना पहिल्या अपत्यांसाठी 5 हजारांचे अनुदान दोन टप्प्यात मिळते. तसेच दुसरे अपत्य हे मुलगी झाल्यास त्यासाठी 6 हजारांचे अनुदान या बाळाच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात दिला जावा, जर एखाद्या मातेस दुसऱ्या गरोदरपणात एकापेक्षा जास्त अपत्य झाल्यास त्यात एक किंवा अधिक मुली असतील तर तिला प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2.0 नियमानुसार दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ मिळेल असे निश्चित झाले. लाभासाठी गर्भधारणेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती अथवा शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी बंधनकारक आहे. तसेच लाभासाठी निश्चित केलेल्या दहा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ग्राह्य धरले जाणार आहे. पहिल्या व दुसऱ्या बाळंतपणात मातेला मिळणाऱ्या लाभातुन मातेचे आहार व आरोग्य सुधारुन बाळ सुदृढ जन्माला येऊन जिल्हयाचे बहु प्रसवाचे प्रमाण कमी होऊ शकते व कुटुंब कल्याण कार्यक्रम मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मोठया प्रमाणात हातभार लागु शकतो. यातुनच गत काही दिवसांपासुन या योजनेचे पोर्टल अपडेशनमुळे लाभ देणे प्रलंबित होते यामुळे अशा मातांना लाभ मिळू शकला नाही. सुधारीत धोरणानुसार दिनांक 01 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीतील दुसरे अपत्य मुलगी झालेल्या मातांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2023 ही अंतीम तारीख राहील असे आरोग्य विभागामार्फत डॉ स्वप्नील बेले,जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी यांनी दिली.
केंद्र शासनस्तरावरुन पंतप्रधानाच्या हस्ते प्रधानमंत्री मातृ वंदना योजना पोर्टलमधील नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना दिनांक 12 ऑगस्ट 2023 रोजी एकत्रीत लाभ वितरीत होणार आहे.
 प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्हयाकरीता 38016 उद्दिष्टे देण्यात आलेले होते त्याअनुषंगाने 40533 इतके उद्दिष्टे पुर्ण करुन केंद्र स्तरावरुन 17 कोटी 02 लाख 87 हजारांची रक्कम लाभार्थ्यांच्या आधार सलग्न असलेल्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे.

 तरी पुढील 2-3 दिवसांत मिशन मोडवर जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यीची संबंधीत पोर्टलवर नोंदणी करण्याच्या सुचना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांनी आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.
याबाबत सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी,आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका,गटप्रवर्तक उत्साहाने काम करत असुन डेटा एन्ट्री ऑपरेटर यांच्या कामाचे विशेष नियोजन करुन मिशन मोडवर आखण्यात आलेले आहे असे डॉ.दावल साळवे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. गडचिरोली यांनी माहिती दिलेली आहे.
आरोग्य विभागामार्फत दिलेल्या अंतीम तारीख दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंतचे दैनंदिन अहवाल व कार्यक्रमाची निगरानी करण्याची जवाबदारी कु.अश्विनी मेंढे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक व सहाय्यक, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, गडचिरोली यांची असणार आहे.