पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न

पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी
होण्याच्या दृष्टीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न

गडचिरोली, दि.11 : पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी गडचिरोली जिल्हातील संपुर्ण 458 ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच त्यांचे संगणकचालक नगरपरिषद / नगरपंचायतीचे कर्मचारी, VLE यांची एकदिवसीय कार्यशाळा फुले – आंबेडकर समाजकार्य महाविदयालये सेमीनार हॉलमध्ये संपन्न झाली.
कार्यक्रमाचे आयोजन सुक्ष्म, लघु व माध्यम रोजगार मंत्रालय (MSME) नागपुर यांनी केले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षपदी महाविदयालयाचे प्राचार्य एस. के. खंगार होते. प्रमुख उपस्थिती विजय शिरसाट Asstt Director MSME, व्ही. व्ही. खरे Asstt Director MSME नागपुर तसेच गडचिरोली जिल्हाचे पीएम विश्वकर्मा योजनेचे नोडल अधिकारी भास्कर मेश्राम हे होते .
पी एम विश्वकर्मा ही योजना संपुर्ण देशात 17 सप्टेंबर 2023 रोजी कार्यान्वीत झाली असुन बारा बलुतेदारांची ओळख निर्माण व्हावी, त्यांना स्थैर्य प्राप्त व्हावे, त्यांना योग्य मार्केंटिंग उपलब्ध व्हावे या करीता त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, टुलकिट देणे 5% दराने कर्ज उपलब्ध करून देणे इत्यादी गोष्टींचा यात समावेश आहे. यात प्रामुख्याने 18 प्रकारचे उद्योग करणा-या कारागीरांचा समावेश होत आहे.
याकरीता प्रत्येक गावातुन त्यांचे ग्रामपंचायत कार्यालयातुन तसेच नगरपरिषद व नगरपंचायत येथुन ऑनलॉईन पध्दतीने नोंदणी करावी. सरपंचाने तसेच मुख्याधिकारी यांनी त्या अर्जाची पडताळणी करून सबंधीत अर्ज जिल्हाधिकारी यांचे लॉगीन मध्ये पाठवावीत. इत्यादी बाबींची जनजागृती होण्याच्या दृष्टिने सदरचे एकदिवशीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होते.