खासदार अशोक‌ नेते यांच्या विशेष प्रयत्नानी देवरी नगर परिषदेला नगर विकास अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न.

खासदार अशोक‌ नेते यांच्या विशेष प्रयत्नानी देवरी नगर परिषदेला नगर विकास अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न.

खासदार अशोक नेते यांच्या विशेष प्रयत्नाने तालुका देवरी येथे नगरपरिषदेला नगर विकास अंतर्गत आज दिं.०५ जानेवारी ला ५,००,०००/पन्नास लक्ष रुपयाचे देवरी च्या विविध विकास कामाचे भूमिपूजन खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते कुदळ मारून संपन्न करण्यात आले.
‌यावेळी मंजुर कामे खालील प्रमाणे….
१) वार्ड क्र. ७ मध्ये बौध्द विहाराला ,सौंदर्यीकरण करणे.

२) प्रभाग क्र. १ मध्ये आमगांव रोड ते भुते यांच्या घरापर्यंत सि.सि. रोड बांधकाम करणे.

३) प्रभाग क्र. ४ मध्ये गणेश नाईक ते सिताराम मानकर यांच्या घरापर्यंत सि.सि.रोड बांधकाम गट्टू लावणे.

४) प्रभाग क्र. ६ मध्ये सदेष जैसवाल ते शितला माता मंदीर पर्यंत सि.सि. रोड बांधकाम व गट्टू लावणे.

५) मौजा देवरी पुष्प क्र. १७ मध्ये कल्याण सी. नैताम ते नथुलाल कोरचे सी.सी. रोड करणे.

अशा पद्धतीचे पाच कामाचे भूमिपूजन कुदळ मारून खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात संपन्न झाले.

यावेळी प्रामुख्याने प्रविण दहिकर तालुका अध्यक्ष भाजपा देवरी, संजू ऊईके अध्यक्ष नगर पंचायत, नितेश वालोदे अध्यक्ष युवा मोर्चा ,जेष्ठ नेते दिपक शर्मा, पिंकीताई कटकावार अध्यक्ष महिला शहर व नगर सेविका सीताबाई रंगारी नगर सेविका , नूतन ताई सय्याम नगर सेविका , शांकी जी भाटिया नगर सेवक , महेश लाडे , श्रावण जी उके व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.