स्नेहसंम्मेलनातुन निर्माण होतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांचा अविष्कार – खासदार अशोक नेते.

स्नेहसंम्मेलनातुन निर्माण होतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कला गुणांचा अविष्कार – खासदार अशोक नेते.

एकात्मता शिक्षण संस्था द्वारा संचालित हिंदू ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी येथे स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन.

ब्रम्हपुरी:-विद्यार्थांच्या कला गुणांना सर्वांगीण वाव मिळावा.यासाठी सतत पस्तीस वर्षापासून भारतीय हिंदु संस्कृती चे मार्गदर्शन, सातत्याने शंभर टक्के निकाल ब्रम्हपुरी क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्था सामाजिक विविध स्तरावरील मान्यवरांचे मार्गदर्शन व संस्थेचे सातत्याने सहकार्य यामुळे छोटयाशा रोपट्याचे कल्पवृक्षात रूपांतर ,शिक्षणाबरोबरच, अध्यात्मिकाचे ज्ञान,चांगले संस्कार, कलागुण,सामाजिक कार्याचे धडे असे उपक्रम या एकात्मता शिक्षण संस्थेच्या हिंदु ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी येथे दिले जाते.याबरोबरच विदयार्थीचे कला कौशल्ये विकसित करण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना
विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये जगत असतांना दूरदृष्टी, लगन, चिकाटी, जिद्द, सहनशीलता गुण अंगीकारले पाहिजे व आत्मसात केले पाहिजे.विद्यार्थ्यांनी दूरदृष्टीने अभ्यास केला पाहिजे.कोणतेही कार्य करतांना जिद्दीने,चिकाटीने, आत्मविश्वास ठेऊन कार्य केले पाहिजे.कुठलाही वाद-विवाद न करता शांत चित्ताने पार पाडावे व सहनशीलता जोपासावी.
विद्यार्थ्यांना कला, कौशल्ये, विकसित व्हावा, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा.
यासाठी स्नेह संमेलनाचे आयोजन केले.या संस्थेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत तसेच सर्वांना सुद्धा नववर्षाच्या शुभेच्छा असे विद्यार्थ्यांना सुचक उदबोधनात्मक मार्गदर्शन खासदार अशोक नेते यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना प्रतिपादन केले.

स्नेह संमेलन या कार्यक्रमा” निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सोहळा, विज्ञान प्रदर्शनी, हस्तकला प्रदर्शनी,याचा सुद्धा या ठिकाणी आयोजन केलं होतं.

याप्रसंगी प्रामुख्याने मंचावर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे‌ अशोक नेते,नागपुर विभागाचे प्रांत कार्यवाहक अतुलजी मोघे,एकात्मता शि.संस्था चे अध्यक्ष अरून काहारे,माजी आमदार प्रा.अतुल भाऊ देशकर, गटशिक्षणाधिकारी पं.स.चे माणिक खुणे,सचिव प्रभिर चौरिकर,सदस्य नारायण बोकडे,प्राचार्य अंजूम सय्यद, संजय खरवडे,साकेत भानारकर,विशाल चौके,प्रा. प्रकाश बगमारे सर,नकुल मेहर,आदिती वानखेडे, सिया पटेल,राधिकाताई जाती, फकीराजी कुर्वे,तसेच हिंदू ज्ञान मंदिराचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.