वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुबियांची खासदार अशोक नेते यांची सांत्वना भेट

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुबियांची खासदार अशोक नेते यांची सांत्वना भेट

गडचिरोली शहरा लगत मौजा- वाकडी ता.जि.गडचिरोली येथील स्व.मंगला विठ्ठल ‌बोडे वय -५२ वर्ष ह्या काल दि.०३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १.०० वा.दरम्यान आपल्या गावालगत च्या शेतशिवारात काम करतांना दबाधरुन बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून त्या महिलेला जागीच ठार केले.

या घटने संबधित माहीती मिळाल्यावर गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी लगेचच वाकडी या गावातील नदिघाटावर जाऊन त्यांच्या दुःखात सामील होऊन कुटुंबियाचीे भेट घेत,त्यांचे दुःख सावरत सांत्वन करत खासदार अशोक नेते यांच्या हस्ते आर्थिक मदत सुद्धा देण्यात आली.

यावेळी खासदार अशोक नेते यांनी वनसंरक्षक अधिकारी व वनविभागाचे अधिकारी तथा वनपरिक्षेत्राधिकारी यांना शासन स्तरावर लवकरात लवकर मदत देण्याचे निर्देश देत वाघाला जेरबंद करा अशा सूचना यावेळी दिल्या.

याप्रसंगी भाजपा ता.महामंत्री बंडू झाडे,ता.सचिव रवींद्र भोयर, वाकडी च्या सरपंच सरिता चौधरी,वनसंरक्षक अधिकारी शर्मा साहेब, RFO नितिन हेमके,ACF धिरज ठेमरे, तसेच वनविभागाचे अधिकारी व गावातील नागरिक उपस्थित होते.