राज्य क्रीडा दिनाचे आयोजन

राज्य क्रीडा दिनाचे आयोजन

गडचिरोली,दि.03: राज्य शासनाच्या निर्देशान्वये, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने दि. 15 जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन “राज्य क्रीडा दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने दि. 15 जानेवारी 2024 रोजी विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे करण्यात येणार आहे व दि. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 08.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली मार्फत राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी दि. 10/01/2024 पर्यंत आपला प्रवेश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदवावा व अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत विजेत्या स्पर्धेकांना पारितोषीक देण्यात येईल. त्याकरीता स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी केलेले आहे.