पट्टेदार वाघाने गोठ्यात घुसून बैलाला केले ठार

पट्टेदार वाघाने गोठ्यात घुसून बैलाला केले ठार

सिंदेवाही :-वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सिंदेवाही अंतर्गत नवरगाव बिटातील उमरवाही येथे एका पट्टेदार वाघाने गोठ्यात घुसून बैलाला ठार केले असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रुपेश आनंदराव बोरकर असे बैल मालकाचे नाव आहे.

मागील अनेक दिवसापासून नवरगाव परिसरात वाघाची दहशत सुरू असून सध्या धानाची कापणी मळणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना नेहमी शेतीवर जावे लागते. मात्र वाघाची दहशत असल्याने शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान रुपेश बोरकर यांचे बैलाच्या गोठ्यात घुसून वाघाने एका बैलावर झडप घालून ठार केले. आणि ५०० मीटर अंतरावर नेऊन सोडले. सकाळी घटनेची माहिती वनविभागाला देऊन पंचनामा करण्यात आला. वनविभाग मार्फत घटनास्थळावर आणि परिसरात कॅमेरे लावण्यात आले असून वाघाचे नमुने घेणे सुरू आहे