पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रास पालकमंत्री याची सदिच्छा भेट

पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रास पालकमंत्री याची सदिच्छा भेट

आज दिनांक ०८/१२/२०२३ रोजी भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण केद्रामध्ये मा. ना. डॉ. विजयकुमार गावित म. रा. मुंबई तथा भंडारा जिल्हा पालकमंत्री यानी सदिच्छा भेट दिली. मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतानी यानी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. मा. पालकमंत्री यानी कौशल्य विकास प्रशिक्षण केद्रातील वाहण चालक प्रशिक्षणार्थी, निशस्त्र सिक्युरिटी गार्ड प्रशिक्षणार्थी तसेच पोलीस वाचनालयातील स्पर्धा परीक्षा देणा-या प्रशिक्षणार्थ्यांना स्वयरोजगाराबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी मा. जिल्हयाधिकारी भंडारा श्री. योगेश कुंभेजकर, मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. लोहित मतानी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा, श्री. समीर कुर्तकोटी, मा. जिल्हा माहिती अधिकारी मॅडम गिरीजा वाघ, भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र खासदार भंडारा श्री. सुनिल मेंढे, – उपविभागीय अधिकारी भंडारा श्री. गजेद्र बांलपांडे, तसेच पोलीस प्रशिक्षणार्थी वाहण चालक, निशस्त्र सिक्युरिटी गार्ड प्रशिक्षणार्थी, पोलीस मुख्यालयातील वाचनालय येथील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी, पोलीस निरीक्षक स्थागुशा भंडारा श्री. चिचोंळकर, पोलीस निरीक्षक भंडारा ठाणेदार श्री. सुर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक ठाणेदार श्री. पाटील सेवानिवृत्त प्रशिक्षक सहा पोलीस निरीक्षक श्री. किष्णा हत्तीमारे, पोलीस प्रशिक्षक पोलीस हवालदार श्री. कोटागले हे उपस्थित होते.