भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात साजरा केला गेला
गडचिरोली,दि.08: भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिन दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी गडचिरोली जिल्ह्यात हा दिवस भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून जिल्हा सैनिक कल्याण कक्ष गडचिरोली यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात, मा. संजय मीणा (भा.प्र.से .) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, गडचिरोली जिल्हातील माजी सैनिक यांच्या उपस्थितीत भारतीय सशस्त्र सेना ध्वजदिन कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात आला.