विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी स्वयंरोजगारा करीता कर्ज योजना

विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील
लोकांसाठी स्वयंरोजगारा करीता कर्ज योजना

गडचिरोली, दि.04: वसंतराव नाईक विमुक्त् जाती व भटक्या जमाती विकास महामंडळा मार्फत विमुक्त् जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील लोकांकरीता स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन कृषी सलंग्न् व्यवसाय, लघुउद्योग, वाहतुक क्षेत्रातील संबंधीत व्यवसाय, तांत्रीक व्यवसाय, पारंपारीक व्यवसाय अथवा सेवा उद्योग सुरु करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक व महामंडळ यांच्या संयुक्त् माध्यमातुन वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना सुरु आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत जास्तीत जास्त् रु. 10 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो व गट कर्ज व्याज परतावा योजने अंतर्गत रु. 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येतो. सदर दोन्ही योजनांनमध्ये लाभार्थ्याला मुद्दल आणि व्याज बँकेत भरावयाची आहे, त्यानंतर महामंडळ व्याजाची रक्क्म 12% पर्यन्त् लाभार्थ्याच्या वैयक्तिक खात्यात जमा करते. या योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना महामंडळाच्या WWW.VJNT.IN या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
तसेच बीज भांडवल कर्ज योजने अंतर्गत रु. 05 लाखापर्यंन्त व थेट कर्ज योजने अंतर्गत रु. 1,00,000/- बीनव्याजी कर्ज पुरवठा करण्यात येतो. सदर योजने करीता महामंडळाच्या कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत.
अधिक माहिती करीता महामंडळाच्या कार्यालयात येवुन संपर्क साधावा व जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती व संस्थांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान जिल्हा व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), गडचिरोली यांनी केले आहे.
कार्यालयाचा पत्ता- जिल्हा व्यवस्थापक, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या
जमाती विकास महामंडळ (मर्या.), डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
आय.टी.आय. चे मागे, कॉम्पलेक्स, गडचिरोली. – 442605. दुरध्वनी क्र. 07132-223026.