अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्काची रक्कम परत करण्याबाबत

मार्च 2019 व ऑगस्ट 2021 महाभरती अंतर्गत अर्ज करण्यात आलेल्या
उमेदवारांचे परिक्षा शुल्काची रक्कम परत करण्याबाबत

गडचिरोली, दि.29:जिल्हा परिषदेच्या गट- क मधील 18 संवर्गातील माहे मार्च 2019 मधील जाहिरात व त्या अनुषंगाने प्राप्त झालेले उमेदवारांचे अर्ज तसेच ऑगस्ट 2021 मधील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेली जाहिरात व संपुर्ण भरती प्रक्रिया शासनाच्या दि.21 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आली असुन जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहे.
त्यानुसार उपरोक्त परिक्षेकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर लिंक उमेदवारांसाठी दि. 05 सप्टेंबर 2023 पासून सुरु करण्यात आली आहे. याबाबत जिल्हा परिषद, गडचिरोलीचे www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर जाहिर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.