शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बोर्डा व एकलव्य निवासी शाळा देवाडा येथे प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बोर्डा व एकलव्य निवासी शाळा देवाडा येथे प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा

Ø 31 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 22 : शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमधील इयत्ता 6वी, इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील अनुशेष भरून काढण्याकरीता प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 5वी ते 8वी मध्ये शिक्षण घेत असलेले व पालकांचे उत्पन्न रु. 6 लाखापेक्षा कमी असलेले अनुसूचित जमाती /आदिम जमातीच्या विद्यार्थी प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षेसाठी पात्र आहेत.

सदर प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन रविवार, दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी इयत्ता 6वी‍ करीता सकाळी 11 ते 1 या कालावधीत तर इयत्ता 7वी ते 9वी करीता सकाळी 11 ते 2 या कालावधीत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बोर्डा,(ता.चंद्रपूर) व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल देवाडा (ता.राजुरा) या दोन केंद्रावर करण्यात येणार आहे.

 सदर प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षे करीता विहीत अर्जाचा नमुना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, प्रशासकीय भवन, पहिला माळा, खोली क्र. 6, चंद्रपूर येथे तसेच प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळा, शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृह येथून प्राप्त करून घ्यावे. अद्यावत माहिती भरलेले विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावे. नमूद तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्विकारल्या जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी मुरुगानंथम एम. यांनी कळविले आहे.