सन 2024 वर्षातील शासकीय स्थानिक सुटया जाहीर 

सन 2024 वर्षातील शासकीय स्थानिक सुटया जाहीर 

भंडारा दि.22: महाराष्ट्र शासन राजकीय सेवा विभागाच्या 16 जानेवारी 1958 च्या शासन निर्णय क्र.पी. 13- बी तसेच दिनांक 6 ऑगस्ट, 1958 च्या समक्रमांकाच्या शासन निर्णयानुसार , जिल्हाधिकारी  योगेश कुंभेजकर  यांनी  सन 2024 या  वर्षाकरिता  भंडारा जिल्ह्याला तीन स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहे.

          त्यामध्ये अक्षय तृतीया  10 मे, 2024 शुक्रवार, पोळा दुसरा दिवस 3 सप्टेंबर, 2024 मंगळवार            नरक चतुर्दशी  31 ऑक्टोबर,2024  गुरुवार,  या  तीन  दिवशी  स्थानिक  सुटी  जाहीर  करण्यात  आली आहे. वरिल आदेश भंडारा जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष बॅक यांना लागु होणार नाही.असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.