एकदिवशीय पेंशन अदालत संपन्न 

एकदिवशीय पेंशन अदालत संपन्न 

         भंडारा,दि.9 : पेंशन अदालतीचे आयोजन महालेखापाल कार्यालय, नागपूर तसेच कोषागार कार्यालय,भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने सामाजिक  न्यायभवन, समाजकल्याण कार्यालय, भंडारा येथील सभागृहात करण्यात आले होते.या अदलतीमध्ये 70 पेक्षा जास्त निवृत्तीवेतनधारक,कर्मचारी तसेच सेवानिवृत्तीवेतन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

       महालेखापाल कार्यालयातील प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ लेखाधिकारी श्रीमती.के.व्हि.टेंर्भुणे,सहाय्यक लेखाधिकारी,श्रीमती.देशपांडे,वरिष्ठ लेखापाल संजय गुल्हाने,लेखापाल किन्नाके तसेच कोषागार अधिकारी,मंगला डोरले,अप्पर कोषागार अधिकारी श्री.पत्की,उपस्थित होते.

         कोषागार अधिकारी यांनी पेंशन अदालत आयोजन करण्याबाबतचा उद्देश कथन केला तसेच जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांना लाभ घ्यावा,व निवृत्तीवेतन प्रकरणे महालेखापाल कार्यालयात सादर करतांना येणाऱ्या अडचणीबाबत माहिती प्राप्त करुन घेण्याबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना संबोधित केले.

        या कार्यशाळेत महालेखापाल कार्यालय,नागपूर येथे निवृत्तीवेतन प्रकरणे सादर करतांना घ्यावयाची काळजी तसेच त्यांना जोडावयाची कागदपत्रे सादर करावी,याबाबतची अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आली.शिक्षण विभाग,वनविभाग,व गृह विभागातील निवृत्तीवेतन प्रकरणे कशाप्रकारे सादर करावीत तसेच प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.

       एन.पी.एस कर्मचारी मृत पावल्यास त्याबाबत त्यांचे वारसदारांना कुटूंब निवृत्तीवेतन प्रदान करतांना प्रकरणे सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले.तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी यांच्या शंकेचे समाधान करण्यात आले.व काही किचकट प्रकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

        या कार्यक्रमाचे संचालन श्री.आपुरकर,आभार प्रदर्शन श्री.रोकडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कोषागार कार्यालयातील  तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहभाग दर्शविला.