आचार संहितेमुळे लोकशाही दिन रद्द…

आचार संहितेमुळे लोकशाही दिन रद्द

 

भंडारा, दि. 30 : विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघ नागपूर विभागातील द्विवार्षिक निवडणूका 2022 आचारसंहिता असल्यामुळे दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी सोमवारला जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सामान्य नागरिकांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येत असतो मात्र आचारसंहितेमुळे तो आयोजित करण्यात येणार नाही.