ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

          भंडारा,दि.8 : जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य  विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा यांचेद्वारे 8 नोव्हेंबर,रोजी सकाळी 11.00 ते सायं.5.00 या वेळेत ऑनलाईन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

          या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.जिल्हयातील नोकरीइच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मोठया प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

       तसेच या मेळाव्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने मुलाखत व तत्सम प्रक्रियेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी मेळाव्यांच्या दिवशी व वेळेत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन सहभागी व्हावे. नोकरी इच्छुक युवक व युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा.

         या मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक नोकरीइच्छुक व गरजू युवक व युवतींनी या सुवर्णसंधीचा आवश्यक लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास सुधाकर झळके यांनी कळविले आहे.

         तसेच याबाबत काही अडचण निर्माण होत असल्यास कार्यालयाच्या 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा श.क.सय्यद मो.क्र.7620378924 यांचेशी संपर्क साधावा.