8 नोव्हेंबर रोजी शेतकरी मेळावा,शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व शिवार फेरीचे आयोजन

8 नोव्हेंबर रोजी शेतकरी मेळावा,शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व शिवार फेरीचे आयोजन

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी संशोधन केंद्र एकार्जुना येथे उद्घाटन

चंद्रपूर, दि. 7 : कृषी संशोधन केंद्र एकार्जुना, कृषी विभाग व आत्मा, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “पिडीकेव्ही-इंडो काउंट सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर कॉटन” या प्रकल्पातंर्गत शेतकरी मेळावा, शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद व शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता कृषी संशोधन केंद्र, एकार्जुना येथे सदर कार्यक्रम पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, विशेष अतिथी म्हणून खासदार अशोक नेते, आमदार सर्वश्री रामदास आंबटकर, अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, कीर्तीकुमार भांगडीया, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर आणि किशोर जोरगेवार आदी मान्यवरांसह शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञ उपस्थित असणार आहे.

तरी,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन एकार्जुना कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा कार्यक्रमाचे आयोजक डॉ.श्रीकांत अमरशेट्टीवार यांनी केले आहे.