8 नोव्हेंबर रोजी पेंशन अदालतीचे आयोजन  

8 नोव्हेंबर रोजी पेंशन अदालतीचे आयोजन  

भंडारा,दि.2: जिल्हा कोषागार कार्यालय, भंडारा अंतर्गत सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारक व कुटूंबनिवृत्तीवेतनधारक यांचे प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता तसेच महत्वाच्या सूचना जाणून घेण्याच्या संदर्भात दिनांक 8 नोव्हेंबर,2023 रोजी सकाळी 11. वाजता सामाजिक न्यायभवन सभागृह भंडारा येथे पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

       तरी सदर पेंशन अदालतीत सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनधारक यांना उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी,भंडारा यांनी कळविले आहे.