समाजाने महर्षी श्री वाल्मिकीचा आदर्श जोपासावे : राहुल पावडे

समाजाने महर्षी श्री वाल्मिकीचा आदर्श जोपासावे : राहुल पावडे

वाल्मिकी समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

चंद्रपूर :-रामायण ग्रंथ रचियीते श्री महर्षी वाल्मिकी यांनी सत्याचा व सद्गुणांचा अंगीकार केला. म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. हा बदल सर्वात होऊ शकतो. आज समाजाला श्री वाल्मिकींनी रचलेल्या रामायणातील शिकवणीची गरज आहे. वाल्मिकी समाजाचे कार्य हे सर्वांसाठी आदर्शवत असून माणूस म्हणून जगण्यासाठी महर्षी वाल्मिकींचा आदर्श जोपासावा, असे आवाहन भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी केले.

महाकाव्य रामायण रचयीते श्रीमहर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीचे औचित्य साधून श्रीमहर्षी वाल्मिकी चौकात महानगर भारतीय जनता पार्टी तर्फे शनिवारी श्रीमहर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी महर्षी वाल्मीकीच्या प्रतिमेस माल्यार्पण करून भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांनी अभिवादन केले व उपस्थित वाल्मिकी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वाल्मिकी समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार शाल व श्रीफळ देऊन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांचा हस्ते याप्रसंगी करण्यात आला .

यावेळी उपस्थितांना मसाला भात मिठाईचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला महानगर पदाधिकारी व कार्यकर्ते व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाला रवी गुनुले दशरथ सिंग ठाकूर अरुण तिखे राजेंद्र खांडेकर पुरुषोत्तम सहारे रवी लोणकर सचिन कोतपल्लीवार प्रमोद शिरसागर चांद सय्यद बंडू गोरकार प्रभाताई गुळदे वंदना संतोषवार शशिकांत मस्के धनराज सावरकर, लखन सारवान, बैजुजी दुलगज, रमेश सारसर, मनोज सारसर, अशोक हटवाल, संजय छपरबंद, विनोद संकत, राज खोडे, महेंद्र छपरबंद, जीतेंद्र सारसर, विजय डाबोडे, दिलीप सारसर, विक्रम छपरबंद, अमर हटवाल,राम सावरकर, मनोज चावरे, विक्रम महातव, बादल मलिक, सुनील राठोड, शैलेश महातव, अमित राठोड, शरद बक्सरीया, विशाल हाते, सुखदेव छपरबंद, आकाश हटलवाल, विशाल छपरबंद, रितेश खोडे, कुसूम दुलगज, मोनिशाबाई महातव, कोमलबाई खोते आदींची उपस्थिती होती.