जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो व किक बॉक्सिंग स्पर्धा 2023 चे आयोजन
गडचिरोली,दि.25:जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय विविध स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली द्वारा प्रकाशित केलेल्या स्पर्धा पुस्तीकेनुसार करण्यात आले. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सदर स्पर्धा पुस्तीकेत तायक्वांदो व किक बॉक्सिंग या क्रीडा स्पर्धांना स्थगिती देण्यात आली असल्यामुळे सदर स्पर्धांच्या तारखा दिल्या नव्हत्या. परंतु आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचानालनालय, म.रा. पुणे यांच्या दि. 29/09/2023 रोजीच्या च्या पत्रान्वये उपरोक्त खेळाच्या जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्याबाबत मान्यता प्राप्त झालेली आहे. त्याकरीता गडचिरोली जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग व तायक्वांदो या स्पर्धांचे आयोजन दि. 31 ऑक्टोंबर, 2023 रोजी क्रीडा प्रबोधिनी, गडचिरोली येथे करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशांत दोंदल यांनी केले आहे.