शहरातील रस्त्यावर बेवारस भटकंती मनोरुग्णांच्या पुनवर्सन शोध मोहिम

शहरातील रस्त्यावर बेवारस भटकंती मनोरुग्णांच्या पुनवर्सन शोध मोहिम

गडचिरोली, दि.23:गडचिरोली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि पोलीस प्रशासन तसेच दिव्यवंदना आधार फॉऊडेंशन यांच्या संयुक्त विदयमानाने २३ ऑक्टोंबर २०२३ रोजी गडचिरोली शहरातील रस्त्यावर बेवारस भटकंती करुन भिक मागुण, वाईट अवस्थेत वावरत असलेल्या मनोरुग्णांना ताब्यात घेवून त्यांच्यावर उपचार करुन त्यांचे पुनवर्सन करण्याकरिता शोध मोहिम राबविण्यात आली. गडचिरोली शहरात दररोज रस्त्यांवर फिरणारे, भिक मागणारे, बरेच मनोरुग्ण फिरतांना दिसतात. अनेक समस्या असल्यामुळे आपण त्यांच्या जवळ जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना सुध्दा त्याचा त्रास सहन करावा लागतो. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या वतीने मागील काही दिवसात अशीच शोध मोहिम अभियाना राबविण्यात आली होती तेव्हा शहरात फिरणा-या मनोरुग्णांना ताब्यात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांची स्वच्छता करुन न्यायालसमोर सादर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशाअन्वये त्यांच्यावर उपचार करण्याकरिता पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा काही मनोरुग्ण शहरात फिरत असल्याबाबत नागरिकांनी त्यांची माहिती दिली होती त्यानंतर प्रशासनाच्या वतीने आज गडचिरोली शहरातील चंद्रपुर रोड परिसर, गांधी चौक, मारकेट लाईन एरिया, आठवडी बाजार, बस स्टॉप परिसर, पंचायत समीती, लांजेडा एरिया, आरमोरी मार्ग, चामोर्शी मार्ग, याठिकाणी शोधमोहिम अभियान राबवून एकुण ०४ मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना दवाखान्यात वैदयकीय उपचार करुन जिल्हा सत्र न्यायालयात सादर करण्यात येईल. सदर शोधमोहिम अभियान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल, प्राधीकरणाचे सदस्य सचिव मा. आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. अभियान राबवितांना विनोद पाटील जिल्हा परिविक्षा अधिकारी महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली, गडचिरोली पोलिस स्टेशन येथील मेश्राम मेजर व टिम, दिव्यवंदना आधार फाऊडेशनचे अध्यक्ष शुभम पसारकर, क्षेत्र कार्यकर्ता रविंद्र बंडावार, सुनिल चौधरी, कांचन निखोडे, प्राची गजभिये पोणिर्मा खोब्रागडे, अस्मीता सरपाते यांनी यशस्वीरीत्या शोधमोहिम अभियान राबविली. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.