सामाजिक न्याय पर्व या कालावधीत तृतीयपंथी व्यक्तीसाठी शिबीराचे आयोजन व दिव्यांगासाठी कार्यशाळा

सामाजिक न्याय पर्व या कालावधीत तृतीयपंथी व्यक्तीसाठी शिबीराचे आयोजन व दिव्यांगासाठी कार्यशाळा

गडचिरोली, दि.24: गडचिरोली जिल्हयातील सर्व ज्येष्ठ नागरीकांना कळविण्यात येते की, सामाजिक न्याय पर्व दिनांक 1 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 या कालावधीत विशेष मोहिमे अंतर्गत ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी शिबीर, तृतीयपंथी व्यक्तीमध्ये जनजागृती करणे तसेच शिबीर आयोजन करणे व दिव्यांगासाठी कार्यशाळा राबविण्याचे निर्देश आहे. त्याचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरीकांची आरोग्य तपासणी शिबीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता. तसेच तृतीयपंथी व्यक्तीसाठी शिबीर व दिव्यांग यांना सामाजिक सुरक्षितता योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळेचे कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाजकल्याण गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एल.आय.सी. रोड गडचिरोली, जिल्हा गडचिरोली, येथे दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीकांनी, तृतीयपंथी व्यक्तीनी व दिव्यांगानी, शिबीराला व कार्यशाळाला उपस्थित राहावे असे आवाहन अमोल यावलीकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे. कार्यालयीन संपर्क क्र. 07132- 222192.