चंद्रपूर : मनसे पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक तसेच जागरूक नागरिकांनी महानगरपालिका समोर आंदोलनात सहभाग व्हावे. – सचिन भोयर

मनसे पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक तसेच जागरूक नागरिकांनी महानगरपालिका समोर आंदोलनात सहभाग व्हावे. – सचिन भोयर

चंद्रपूर
हल्ली पावसाळ्याचे दिवस आहे आणि संपुर्ण चंद्रपूरकर रस्त्यावरील खड्डे व चिखलमय रस्ते यामुळे त्रस्त आहे.या एकूण परिस्थितीसाठी अमृत योजने अंतर्गत शहरात सुरू असलेले पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे नियोजन शून्य, भ्रष्ट कामाला जबाबदार असलेले कंत्राटदार संतोष मुरकुटे अंदाज पत्रकाप्रमाणे काम करत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
परंतु मनपा आयुक्त व अधिकारी तसेच पदाधिकारी कंत्राटदाराची पाठराखण करत आहे.
वारंवार तक्रारी करूनही कोणताही ठोस कारवाई करण्यात आली नाही.
शहरातील नव्याने बनवण्यात आलेले रस्ते खोदून ठेवले परंतु त्याची दुरुस्ती कंत्राटदार करत नाही आहे.काही तरी थातूरमातूर दुरुस्ती करून बोगस, भ्रष्ट, निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे.
चंद्रपूरकरांना होणारा रस्त्यावरील खड्यांचा व चिखलमय रस्त्यांचा त्रास बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा चंद्रपूर तर्फे तीव्र निदर्शने, अभिनव आंदोलन करण्याचे योजिले आहे तरी आपण सर्व मनसे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक तसेच जागरूक नागरिकांनी 29/7/2021 रोज गुरुवार दुपारी 12:30 वाजता चंद्रपूर महानगरपालिका समोर आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाचे नेतृत्व करावे असे आवाहन नगरसेवक तथा मनसे नेते सचिन भोयर यांनी केले आहे.