महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांचे आयकराबाबत सुचना

महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांचे आयकराबाबत सुचना

गडचिरोली, दि.13: माहे ऑक्टोबर 2023 चे निवृत्तीवेतनापासुन, आर्थिक वर्ष सन 2023-24 करीता आयकर बसत असलेल्या राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्तीवेतनातुन NEW TAX REGIME नुसार आयकराची कपात केली जाणार आहे.
ज्या निवृत्तीवेतनधारकांना OLD TAX REGIME नुसार आयकराची गणना करावयाची आहे त्यांनी आयकरातुन सुट मिळण्याकरीता लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हा कोषागार कार्यालयास 20 ऑक्टोबर 2023 पर्यत लेखी अर्ज करावे. असे जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.