ओबीसी जागर यात्रेचे सिंदेवाही येथे जंगी स्वागत

ओबीसी जागर यात्रेचे सिंदेवाही येथे जंगी स्वागत

सिंदेवाही प्रतिनिधी :-भारतीय जनता पक्षाच्या केंद्र आणि राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या विकासाकरिता सुरू केलेल्या योजनांची माहिती ओबीसी समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्याकरिता व प्रबोधन व जनजागृतीच्या माध्यमातून त्यांना लाभ मिळवून देण्याकरिता २ ऑक्टोबरला सेवाग्राम येथून ओबीसी जागर यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख, तसेच
महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांच्या नेतृत्वात या ओबीसी जागर यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेचे सिंदेवाही येथे दसरा चौकात आगमन होताच भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर दसरा चौक ते शिवाजी चौकापर्यंत पद्दल यात्रा काढण्यात आली व शिवाजी चौकात आतषबाजीत स्वागत करण्यात आले.

यावेळी सिंदेवाही भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये ओबीसी समाजाकरिता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती देण्यात आली.
यावेळी आशिष देशमुख यांनी यांनी जोरदार बॅटिंग करत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व करणाऱ्या व विरोधी पक्षनेते असलेल्या विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वर जोरदार हल्ला करून ब्रह्मपुरी विधानसभा सभेमध्ये पालकमंत्री असताना कोणता विकास साधला असा प्रश्न करत यावेळी ब्रह्मपुरी विधानसभा मधुन हद्दपार करा असे सांगितले. ओबीसी समाजासाठी भारतीय जनता पक्षाने नेहमी पुढाकार घेऊन त्याच्या सोबत राहीला आहे स्पष्ट केले तसेच केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजासाठी अनेक योजना आणल्या असुन सर्वप्रथम ओबीसी मंत्रालय स्थापन करून त्या माध्यमातून ओबीसी बांधवाना स्वतंत्र घरकुल योजना व स्वतंत्र कर्ज दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मंचावर संजय गाते, अध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र, अर्चनाताई डेहनकर प्रदेश महामंत्री ओबीसी मोर्चा, हरीश शर्मा जिल्हाध्यक्ष बीजेपी चंद्रपूर, राजू पाटील बोरकर, अध्यक्ष, भाजपा सिंदेवाही, संजूभाऊ गजपूरे, माजी जि.प. सदस्य, नागभीड, लोकनाथजी बोरकर, छायाताई हाडगे, शहर अध्यक्ष, सिंदेवाही, आशिष चिंतलवार, युवा नेतृत्व, देवेंद्र मंडळवार, कमलाकर सिद्धमशेट्टीवार , ज्येष्ठ समाजसेवक, रविंद्र चव्हाण, रवि नूरकर, डि.डी. सोनटक्के, निलेश गुडधे व रितेश अलमस्त मुरलीधर मडावी देवराव कोठेवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.