उत्पादन व रोजगार वाढ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

उत्पादन व रोजगार वाढ मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

 

         भंडारा,दि.17 : अॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ,नागपूर उद्योग व वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार, यांचे मार्फत दि.22 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता नियोजन भवन ,जिल्हाधिकारी कार्यालय ,भंडारा येथे आउटरिच कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.भारत सरकार तर्फे जिल्ह्यात निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्याचे दृष्टीने निर्यातीस प्रोत्साहन ,उत्पादन व रोजगार वाढ करण्याकरिता प्रयत्नाचा भाग म्हणून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.या कार्यक्रमात DGFT नागपूर कार्यालयामार्फत IEC नोंदणी ,निर्यात प्रक्रिया निर्यातीबाबत शासनाच्या योजना ,निर्यातीत भांडवल पर्याय , ई- कॉमर्स आदि विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील उत्पादकांना/निर्यातदारांना या कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन करावी,असे आवाहन महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा यांनी कळविले आहे.