अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृती साठी अर्ज करण्यासा मुदवाढ

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृती साठी अर्ज करण्यासा मुदवाढ

        भंडारा,दि.26 :देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षि शाहू महाराज शिष्यवृती या योजनेसाठी सन 2023-24 करिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले होते.

         तथापि शैक्षणिक संस्थामधील सन 2023-24 मधील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.सबब आयुक्तालयाचे दिनांक 13 ऑगस्ट,2023 च्या जाहिरातीद्वारे मागविण्यात आलेल्या अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 4 जानेवारी,2024 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय,3 चर्च रोड,पुणे-411001 येथे सादर करावेत.

         अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in जलद दुवे रोजगार या संकेत स्थळाला भेट द्यावी.असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभागाचे बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.