प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन…

प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

गडचिरोली, दि.04 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर,गडचिरोली व श्री गोविंदराव मुनघाटे आर्टस ॲन्ड सायन्स्‍ कॉलेज कुरखेडा यांच्या संयुक्त्‍ विद्यमाने दिनांक 06 आक्टोबर 2023 रोजी श्री गोविंदराव मुनघाटे आर्टस ॲन्ड  सायन्स्‍ कॉलेज कुरखेडा येथे ठिक 11.00 ते 4.00 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यांत येत आहे.अ.क्र. कंपनीचे नाव पदाचे नांव रिक्तपदे 1 एल.आय.सी. गडचिरोली इंशुरन्स्‍ अडव्हायझर 100 सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये वरील कंपनी उपस्थित राहणार असून उमेदवारांना रोजगाराचा लाभ्‍ घेण्यासाठी‍ सदर प्लेसमेंट ड्राईव्हकरिता ईच्छूक असलेल्या उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि. 06 ऑक्टोबर 2023 रोजी श्री गोविंदराव मुनघाटे आर्टस ॲन्ड  सायन्स्‍ कॉलेज कुरखेडा येथे उपस्थित राहून प्लेसमेंट ड्राईव्हचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता कार्यालयाशी 07132-222368 या क्रमांकावर संपर्क साधावा.