शहराध्यक्षापदी मधुकर चौधरी,तालुकाध्यक्षपदी ईश्वर कळंबे यांची निवड 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांची नियुक्ती
शहराध्यक्षापदी मधुकर चौधरी,तालुकाध्यक्षपदी ईश्वर कळंबे यांची निवड 
—:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी  दिलेला योगदान लक्षात घेऊन ईश्वर कळंबे व मधुकर वातुजी चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरद पवार गट) भंडारा तालुका व शहर अध्यक्षपदी शासकिय विश्रामगृह येथे नुकतीच निवड करण्यात आली आहे.
ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केलेली आहे. हे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भंडारा तालुका व शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी अतिशय उत्तम रित्या करून पक्ष मजबूत करत आहेत. तसेच समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार  शरदचंद्र पवार यांचे विचार क्षेत्रात पोहोचवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असल्याने त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी, भंडारा पवनी विधाससभा अध्यक्ष अजय मेश्राम, अरूण गोंडाणे, सुकराम अतकरी, वरकडे,राकेश शामकुवर, महासचिव दिलीप सोनुले आदींच्या उपस्थितीत जिल्हयातील विविध पदावर अनेकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.  त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गटाच्या) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, सुकराम अतकरी, जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना दिले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.