महिला व बालविकास विभागाचा आढावा वात्सल्य योजनेची गती वाढवा- जिल्हाधिकारी

महिला व बालविकास विभागाचा आढावा वात्सल्य योजनेची गती वाढवाजिल्हाधिकारी

भंडारा दि. 28 : महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी वासल्य योजना अधिक गतीने राबवावी, त्या योजनेचा अहवाल वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज महिला व बालविकास विभागाच्या झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. या बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तुषार पवनीकर व महिला व बालविकास अधिकारी मनीषा कुरसुंगे, विविध समित्यांचे पदाधिकारी तथा शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोविड मध्ये महिलांसाठी व बालकांसाठी वात्सल्य योजनेअंतर्गत अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांमधून प्राधान्याने महिला आत्मनिर्भर आर्थिक दृष्ट्या निर्भर झाली पाहिजेत, अशा पद्धतीचे उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. सखी वन स्टॉप सेंट,र समुपदेशन केंद्र तसेच विविध योजनांचा आढावा  यावेळी घेण्यात आला.