परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम महत्वाची – आषुतोष सपकाळ/ कचरामुक्त गावासाठी सरसावले शेकडो हात

परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम महत्वाची – आषुतोष सपकाळ

कचरामुक्त गावासाठी सरसावले शेकडो हात

नागरिकांसह लोकप्रतिनिधी,अधिकारी, कर्मचा-यांचा मोठा सहभाग

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियाना दरम्यान महाश्रमदान मोहीम

चंद्रपुर (प्रतिनिधी) दिनांक 18/09/2023 केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार  15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधित जिल्यात स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये विविध उपक्रम राबवायचे आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात प्रत्येक गावात महाश्रमदान मोहीमेचे आयोजन केले होते. जिल्ह्यात विविध ठिकाणी श्रमदानात लोकांनी सहभाग नोंदवला. सतत श्रमदान मोहिम लोकांमधुन झाल्यास गावातील प्रत्येक सार्वजनिक परिसर हा स्वच्छ दिसणार .परिसर स्वच्छतेसाठी श्रमदान मोहीम महत्वाची असल्याचे चंद्रपुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आषुतोष सपकाळ यांनी श्रमदान प्रसंगी दाताळा गावात मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.

             महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन केंद्र व राज्य शासन यांच्या निर्देशानुसार 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधित स्वच्छता ही सेवा  हे अभियान राबविण्यात येत असुन, अभियानाची कचरा मुक्त भारत अशी संकल्पना आहे. या अभियानात नागरिकांनी सहभागी होवुन प्रत्येक गावात अभियान राबविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत चंद्रपुर जिल्ह्यातील गावा गावात श्रमदान मोहिममध्ये शेकडो नागरिक हातात झाडु घेवुन, स्वच्छतेसाठी पुढे आले. गावा गावातील सार्वजनिक ठिकाणे या श्रमदान मोहीमे मधुन स्वच्छ करण्यात आले . या महाश्रमदान मोहीमेत गावक-यांसह अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्यास्वरुपात सहभाग नोंदवला. जिल्ह्यात ठिक ठिकाणी महाश्रमदान मोहीमेत चांगला सहभाग मिळाला असुन, चंद्रपुर मध्ये दाताळा येथे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आषुतोष सलिल यांच्या सह उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोटे यांनी सहभागी होवुन श्रमदान केले. यासह जिल्ह्यातील पंधराही तालुक्यातील गटविकास अधिकारी व कर्मचारी यांनी विविध ठिकाणी श्रमदान मोहीमेत सहभाग नोंदवला.याशिवाय 24 सप्टेंबर ला स्वच्छता रन, 25 सप्टेंबर ला स्वच्छता कर्मचा-यांची आरोग्य तपासणी व सत्कार, 30 सप्टेंबरला एकदिवस स्वच्छतेचा ,  शालेय स्तरावर घोषवाक्य स्पर्धा, कविता लेखन, गावस्तरावर रांगोळी स्पर्धा, अशा विविध स्पर्धासह 2 ऑक्टोंबरला प्रत्येक गावात स्वच्छता दिवसाचे आयोजन करुन जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छता शपथ दिल्या जाणार आहे.

चंद्रपुर जिल्ह्यात महाश्रमदान मोहीम मोठ्या स्वरुपात जनतेच्या सहका-याने राबविता आली. यातुन जिल्ह्यातील गावा गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करता आला. याच बरोबर स्वच्छता सेवा मोहीमे मधिल स्वच्छता रन, स्वच्छता कर्मचा-यांची आरोग्य तपासणी व सत्कार, एक दिवस स्वच्छतेसाठी, स्वच्छता संवाद,स्वच्छता दिवस हे उपक्रम  प्रत्येक गावात यशस्वी करा.

– विवेक जॉनसन, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.चंद्रपुर.