घड्याळी तासिका तत्त्वावर शिक्षक पदांकरीता मुलाखत

अनु.जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये

घड्याळी तासिका तत्त्वावर शिक्षक पदांकरीता मुलाखत

चंद्रपूर दि.14: अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा भिवकुंड (विसापूर) व मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूरकरीता घड्याळी तासिका तत्त्वावर शिक्षक पदांची मुलाखतीद्वारे भरती करण्यात येत आहे.

शैक्षणिक सत्र 2023-24 या वर्षासाठी केवळ 11 महिने कालावधीकरीता घड्याळी तासिका तत्त्वावर इयत्ता 5वी ते 10 वीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी माध्यमातून सर्व विषय शिकविण्यासाठी शिक्षकांची आवश्यकता आहे. त्याकरीता पात्र उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी दि. 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर) ता. बल्लारपूर येथे सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरीत्या उपस्थित राहावे. उमेदवारांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल. उमेदवारास नेमणूक दिल्यानंतर शासन नियमानुसार मानधन अदा करण्यात येईल.

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर) ता. बल्लारपूर करीता सहाय्यक शिक्षक या पदाकरीता शैक्षणिक पात्रता बी.ए, डी.एड./एम.एस.सी.,बी.एड(विज्ञान)/ एम.ए.,बी.एड.(हिंदी, सामाजिकशास्त्र)तर अनु.जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,चिमूरकरीता सहाय्यक शिक्षक पदासाठी बी.ए.डी.एड./बी.पी.एड./बी.एस.सी.डी.एड,/बी.ए.,बी.एड(मराठी/हिंदी),बी.एस.सी,बी.एड.(विज्ञान) शैक्षणिक पात्रता धारण  केलेली असावी.

मुलाखतीसाठी येण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. याची नोंद घ्यावी, असे समाज कल्याण विभागाचे  सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.