वन्यजीव अभयारण्य कोका येथे रोजगार व स्वयंरोजगाराबाबत कार्यशाळा संपन्न

वन्यजीव अभयारण्य कोका येथे रोजगार व स्वयंरोजगाराबाबत कार्यशाळा संपन्न

भंडारा, दि. 3 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व वन्यजीव अभयारण्य कोका यांच्या संयुक्त विद्यमाने 2 नोव्हेंबर 2022 रोजी वनविश्राम भवन कोका येथे रोजगार व स्वंयरोजगाराबाबत एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कोका वनपरिक्षेत्रातील भाग हा वन्यजीव अभयारण्यात समाविष्ट झाल्यामुळे परिसरातील गावांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी कशा पध्दतीने उपलब्ध करुन देता येतील व त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष कसा कमी करता येईल याबाबत कार्यशाळेमध्ये चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी, माकडे, वनपरिक्षेत्राधिकारी नरड उपस्थित होते.

वनपरिक्षेत्रा लगतच्या गावातील युवक/युवतींकरीता कौशल्य प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच त्यांच्याकरीता रोजगार मेळाव्याचे आयोजन करुन त्यांना नामांकित खाजगी कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल असे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी सांगीतले. रोजगार व स्वंयरोजगार विभागाच्या मदतीने वन्यजीव परिक्षेत्रालगतच्या गावातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे माकडे यांनी सांगीतले.

कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, कौशल्य विकास अधिकारी भाऊराव निबांर्ते, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक सोनु उके, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक सुहास बोंदरे, महात्मा गांधी नॅशनल फेलो मिरा मांजरेकर तर कोका वन्यजीव अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी माकडे, वनपरिक्षेत्राधिकारी नरड, आर.पी.धनविज, जे.जी.नागपुरे, एस.पी.दिघोरे, एस.बी.ठाकरे, सी.जी.जारवाल, आर.व्हि.लखवाल, ए. डी. साखरवाडे उपस्थित होते