गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन

गडचिरोली पोलीस दल प्रोजेक्ट उडान अंतर्गत “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोज

• १२७ युवक युवतींना मिळाला नवीन रोजगार.

गडचिरोली जिल्हयातील गरजु युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन प्रोजेक्ट उडाण अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांचे मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींकरीता गडचिरोली पोलीस दल व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव, पार्कसन्स इन्स्टीट्यूट आणि मेहमूदा शिक्षण बहुउद्देशिय संस्था, नागपूर तसेच एसआयएस, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ०६/०९/२०२३ रोजी “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन पोलीस मुख्यायल परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.

या रोजगार मेळाव्यात दुर्गम अतिदुर्गम भागातील विविध प्रकारच्या स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी २०० ते २५० बेरोजगार उमेदवार सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उमेदवारांमधुन एसआयएस, चंद्रपूर यांचे मार्फत सुरक्षा रक्षक- ५० प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन राळेगाव यांचे मार्फत हॉस्पिटॅलिटी- १५, आटोमोबाईल- ०५ इलेक्ट्रीशिअन ३२ व पार्कसन्स इन्स्टीट्युट, नागपूर यांचे मार्फत नर्सींग असीस्टंट करीता २५ अशा एकुण १२७ उमेदवारांची निवड प्रशिक्षणाकरीता करण्यात आली. प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले. विविध प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या उमेदवारांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी कौतुक केले असून, त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्हयातील युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव तत्पर असून, नेहमी तुमच्या पाठीशी राहील, आपले मित्र व आप्तस्वकीय यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या कुटूंबियांचे राहणीमान उंचवावे.

आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५५१, नर्सिंग असिस्टंट १२३७, हॉस्पीटॅलीटी ३२२, ऑटोमोबाईल २७६, इलेक्ट्रीशिअन २०१, प्लम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल डयुटी असिस्टंट ३८४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२, सेल्समैन ४ असे एकुण ३२६८ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन ( आत्मा ) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर २०९ मत्स्यपालन ११२, कुक्कुटपालन ५८५, बदक पालन १००, वराहपालन १०, शेळीपालन १७७, शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी १५, भाजीपाला लागवड १६५५ पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण १०६२, दु व्हिलर दुरुस्ती १३४, फास्ट फुड १६५, पापड लोणचे ५९, दु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ५९२, एमएससीआयटी २३१, कराटे प्रशिक्षण ४८ व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण ७० असे एकुण ५६७४ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर रोजगार मेळावा कार्यक्रमास मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री कुमार चिंता सा. तसेच पार्कसन्स इन्स्टीट्यूट नागपूरचे मोबलायझेशन ॲन्ड प्लेसमेंट हेड श्री. हेमंत बन्सोड व श्री. स्वप्नील उसेंडी, काउन्सलर श्रीमती माधुरी भांडेकर, प्रथम एज्युकेशन फाऊडेशनचे श्री. आशिष इंगळे, एसआयएस (सिक्युरिटी) चंद्रपूरचे फ्रेंच हेड श्री. तरुण कुमार द्विवेदी, ऑपरेशन एक्झीक्युटीव श्री. अखिलेश यादव, मेहमुदा शिक्षण बहुउद्देशिय संस्था नागपूर ‘चे श्री. राहुल चौधरी व श्री. शुभम मनीक्कुवार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.