दुग्धत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रूपये प्रतिलिटर दराने भाव योजनेचा लाभ घेण्याचे विभागाचे आवाहन

दुग्धत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रूपये प्रतिलिटर दराने भाव योजनेचा लाभ घेण्याचे विभागाचे आवाहन

भंडारा दि. 1 : राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित केलेल्या दुध दरानुसार भाव मिळत  नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळण्याकरिता जिल्ह्यात स्वीकृत होणाऱ्या वेगवेगळया दुधाच्या गुणप्रतीत एकसूत्रता यावी यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर दुधाची गुणप्रत निश्चित केली आहे.

जिल्ह्यातील सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पा मार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दुध उत्पादक शेतकरी यांना प्रतिलिटर रु. ५/- अनुदान देय राहील.सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पा मार्फत दुध उत्पादक शेतकरी यांना ३.५ फट /८.५ एसएनएफ या गुणप्रतीकरिता किमान रु.२७/- प्रतिलिटर इतका दर संबंधित दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने (ऑन लाईन) अदा करणे बंधनकारक असून त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रतिलिटर रु. ५/- अनुदान बँक खात्यावर थेट डीबीटी करण्यात येईल. डीबीटी करण्यासाठी दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी इअर टॅग संलग्न असणे आवश्यक आहे.

ही  योजना हि दि.११ जानेवारी २०२४ ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीकरिता राबविण्यात येणार आहे. तरी या योजनेमध्ये जिल्ह्यातील भाग घेतलेल्या सहकारी दुध संघ व खाजगी दुध प्रकल्पांना आवाहन करण्यात येते कि , आपल्या  अंतर्गत असलेल्या दुग्ध संस्थाच्या शेतकऱ्यांना इयर टॅग नोंदणी व फार्मर आयडीबाबत अवगत करून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून नोंदणी करून उपलब्ध करून घ्यावा,असे आवाहन जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी मीना चिमोटे यांनी केले आहे.