माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावे.

माजी सैनिकांच्या पाल्यांनी अर्ज करावे.

भंडारा,दि.30:- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे तसेच देश, राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणिय काम करणारे माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच दहावी व बारावी बोर्डाच्या परिक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना सन्मानित करण्यात येते. ज्या माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांस शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डात 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले असतील त्यांनी त्यांचा अर्ज, मार्कशिट व बोनाफाईड प्रमाणपत्र घेऊन 11 ऑक्टोंबर 2021 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय भंडारा येथे अर्ज सादर करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भंडारा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.