शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून आदिवासी दिव्यांग लाभार्थ्यास मिळणार इलेक्ट्रिक ट्रायसिकल

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाकडून आदिवासी दिव्यांग लाभार्थ्यास मिळणार इलेक्ट्रिक ट्रायसिकल

Ø शाखा कार्यालयात नावे नोंदविण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.22 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक, शाखा कार्यालय, चंद्रपूरमार्फत जिल्ह्यातील अपंग/अस्थिव्यंग/दिव्यांग असलेल्या आदिवासी महिला व पुरुषांना इलेक्ट्रिक ट्रायसिकल उपलब्ध करून देण्याबाबत नाशिक मुख्य कार्यालयामार्फत सूचना प्राप्त झाल्या आहेत.

त्याअनुषंगाने, जिल्ह्यातील अपंग/अस्थिव्यंग/दिव्यांग असलेल्या आदिवासी लाभार्थ्यास ट्रायसिकलची आवश्यकता असल्यास त्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, गाव, संपर्क क्रमांक, जातीचा दाखला, आधारकार्ड व अपंगाचे प्रमाणपत्रासह शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नावे नोंदवावी. जेणेकरून, इच्छुक लाभार्थ्यांची नावे मुख्यालयास कळविण्यात येतील, असे शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक आर. एस. भदाणे यांनी कळविले आहे.