15 ऑगस्ट 2023 चा भारतीय स्वातंत्र दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात संपन्न

15 ऑगस्ट 2023 चा भारतीय स्वातंत्र दिनाचा 76 वा वर्धापन दिन समारंभ उत्साहात संपन्न

भारतीय स्वातंत्र दिनाचा 76 वा वर्धापन दिन सभारंभ दिनांक 15 ऑगस्ट 2023 निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8:05 वाजता मा. श्रीमती आयुषी सिंह भा.प्र.से. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे शुभहस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र भुयार व मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) श्री शेखर माधव शेलार जिल्हा परिषद, गडचिरोली तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागातील खाते प्रमुख व अधिकारी / कर्मचारी वृंद इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांना मानवंदना देऊन ध्वजारोहणाकरिता आणण्याचे कार्य श्री म्हस्के महात्मा गांधी हॉयस्कूल, नवेगाव यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत व समूहगीत गायन केले.

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडावंदन नंतर भारत सरकारचा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच ई-सिगारेट बंदीबाबतचा दि. 18/9/2019 चा अध्यादेश यांची प्रभावी अंमलबजावणी होणेकरिता 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त “तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली.

त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सफाई कामगार यांना स्वच्छता करतांना परिधान करावयाचा पोषाख मा. श्रीमती आयुषी सिंह भा.प्र.से. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे शुभहस्ते वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद इमारतीचे प्रांगणात वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्री ठाकूर जि. प. हॉयस्कूल, गडचिरोली यांनी केले. तर श्री अमरसिंग गेडाम विस्तार अधिकारी (शिक्षण) जि. प. गडचिरोली यांनी उपस्थितांचे आभार मानले.