विशेष वृत्त नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी कार्यरत सेवा हक्क आयोग

विशेष वृत्त नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी कार्यरत सेवा हक्क आयोग

         भंडारा,दि.18 : शासना द्वारा विविध विकास कामांच्या योजना,सेवा,सुविधा नागरिकांसाठी राबविण्यात येतात. त्या सेवा नागरिकांना विहित कालमर्यादित मिळाव्यात, यावर सनियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सेवा हक्क आयोग कार्यरत आहे.

      राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक,गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015पारित करण्यात आला असून तो.28 एप्रिल 2015 पासून अंमलात आहे.नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

        तरी वरिलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत.किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत.तसेच आयोगाचे मुख्यालय नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालय आहेत.

        तसेच पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्व संबंधितांना वरीष्ठाकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते.व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते.कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रुपये,पाच हजार पर्यत दंड होऊ शकतो.

 राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट  https://aaplesarkar.mahaonline.gov.in  यावर संबंधितानी  संपर्क साधावा.