17 ऑगस्ट रोजी नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे एक्सपोर्ट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

17 ऑगस्ट रोजी नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली
येथे एक्सपोर्ट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली, दि.14: कळविण्यात आनंद होत आहे की, मा.पंतप्रधान यांचे संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी निर्यात बंधु योजनेचे माध्यमातून प्रत्येक जिल्हयाला निर्यात केंद्रात बदलण्यासाठी, स्थानिक वस्तु / सेवांच्या निर्यातीला वाव मिळून प्रोत्साहन देण्यासाठी, आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार व्होकल फॉर लोकल, आणि मेक इन इंडियासाठी प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र करण्याचा मानस आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हयातील निर्यातीस वाव तसेच प्रोत्साहन मिळून उत्पादन व रोजगार निर्मीती मध्ये वाढ होणार आहे.
निर्यातवाढीसाठी दिनांक 17.08.2023 गुरुवारी सकाळी 11.00 ते 1.00 वाजेदरम्यान नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे एक्सपोर्ट आउटरिच कार्यक्रमाचे आयोजन अतिरिक्त महासंचालक, विदेश व्यापार महानिदेशालय, नागपूर विभाग यांचेमार्फत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात डीजीएफटी नागपूर येथील तज्ञांची टीम आयइसी, कस्टम प्रक्रिया, एमएसएमइ योजना, निर्यात कसे मिळवावे बायर-सेलर मीट, इपीसीची भुमिका, वित्तीय सहायता मिळण्यासाठी पर्याय, इ-कॉमर्स याबाबत व्हिडीओ सादरीकरण करणार आहे.
अध्यक्ष जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समिती तथा जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळणार असून या समितीचे सर्व सदस्य देखील सहभागी होणार आहेत. निर्यातीसंदर्भात अडीअडचणी, विविध योजना बाबत प्रश्नात्तरांचा कार्यक्रम असून तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अल्पोहार व चहापानानंतर समारोप होणार आहे.
या सुवर्णसंधीचा गडचिरोली जिल्हयातील सर्व उद्योजक, औद्योगिक संघटना एफपीओ, शेतकरी कंपन्या एफपीओ, एक्सपोर्ट करण्यास इच्छुक युवक युवती तसेच सध्या कार्यरत एक्सपोटर्स यांनी सक्रिय सहभागी होवून या एक्सपोर्ट आउटरिच कार्यक्रमाचा प्रचार प्रसार आपल्या व्हॉटसॲप ग्रुप , सोशल मिडीया, स्थानिक वर्तमानपत्रे इत्यादी वर शेअर करावा व गडचिरोली जिल्हयाचे विकासासाठी आपण सर्वांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन स्वप्नील राठोड, सदस्य सचिव, जिल्हास्तरीय निर्यात प्रचालन समिती तथा महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे.