कुरखेडा व कोरची तालुक्यातील पोलीस पाटील (पेसांतर्गत) पदभरतीसाठी जाहिरात-2023 बाबत सूचना

गडचिरोली जिल्हयातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कुरखेडा अंतर्गत (कुरखेडा व कोरची) तालुक्यातील पोलीस पाटील (पेसांतर्गत) पदभरतीसाठी जाहिरात-2023 बाबत सूचना
गडचिरोली, दि.14: सर्व जनतेला कळविण्यात येते की, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कुरखेडा यांचे अंतर्गत (कुरखेडा व कोरची) एकुण 85 पदे रिक्त असून त्यापैकी 100 % (पेसा) पोलीस पाटील पदाचे 81 पदे रिक्त असून त्यामध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण करीता एकुण 54 पदे रिक्त आहेत. तसेच अनुसूचित जमाती महिला राखीव 27 रिक्त आहेत तसेच 25% ते 50% अनुसूचित क्षेत्रातील पोलीस पाटील पदाचे एकुण 04 पदे रिक्त असून त्यापैकी अनुसूचित जमाती सर्वसाधारण करीता 02 पदे रिक्त आहेत. तसेच अनुसूचित जमाती महिला राखीव करीता 01 रिक्त आहेत. तसेच विमुक्त जाती-अ करीता 01 पद राखीव आहे. सोबत जोडलेल्या यादीनुसार जाहिरातीमधील नमूद स्थानिक गावातील अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती महिला राखीव, व वि.जा.-अ संवर्गातील आवश्यक आर्हता धारक व्यक्तीकडून विहित नमूण्यात ऑफलाईन पध्दतीने दिनांक 16.08.2023 ते 24.08.2023 पर्यंत स्थळ उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे अर्ज मागविण्यात येत आहे. पोलीस पाटील या पदाचे सरळसेवा भरती प्रक्रीयेचा सविस्तर जाहिरनामा, तहसिल कार्यालय, कुरखेडा/कोरची, पंचायत समिती,कुरखेडा/कोरची यासोबत जोडलेल्या यादीत नमूद केल्यानुसार सर्व गावात, तसेच तलाठी कार्यालय सर्व, व या कार्यालयातील नोटीस बोर्डावर दिनांक 14.08.2023 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी ईच्छुक स्थानिक उमेदवारांनी दिलेल्या पात्रतेचे निकष व विहित अटी व शर्तीवर अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे सादर करावा. असे विवेक साळुंके, अध्यक्ष,पो.पा. निवड समिती, तथा उपविभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांनी कळविले आहे.