जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम

भंडारा दि.14: शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण सोहळा मंगळवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 भंडारा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानात होणार आहे.

      यावेळी   जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर संबोधित करणार आहेत. मंगळवारी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, सैन्य दलातील अधिकारी, वीर-माता, वीर-पत्नी, पुरस्कार प्राप्त अधिकारी कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.