शेकडो विदयार्थी ,अधिकारी -कर्मचा-यांच्या सामुहिक स्वरात दुमदुमली पंचप्रण प्रतिज्ञा

शेकडो विदयार्थी ,अधिकारी -कर्मचा-यांच्या सामुहिक स्वरात दुमदुमली पंचप्रण प्रतिज्ञा

            भंडारा दि.9 :- मेरा माटी ,मेरा देश अर्थात माझी माती,माझा देश या संकल्पनेच्या पंचप्रण प्रतिज्ञेच्या दिवशी आज सकाळी 10 वाजता जिल्हयातील शेकडो विदयार्थी –विदयार्थीनी शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी आज “ भारतास 2047 पर्यत आत्मनिर्भर आणि विकसित राष्र्प बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू.देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करू,भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू , देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू.” ही सामुहिक शपथ घेतली.

     दरम्यान  सकाळी ऑगस्ट क्रांती दिनानिमीत्त हुतात्मा स्मारक  येथे  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर ,पोलीस अधीक्षक  लोहित मतानी,यांनी  पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी  मान्यवरांनी महात्मा गांधी ,इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प फुले अर्पण केले.  मेरी माटी ,मेरा देश या उपक्रमानिमीत्त आयोजित हातावर दिवे घेऊन पंचप्रण शपथ घेण्यात आली.

          जिल्हाधिकारी यांनी मशाल  पेटवून मशाल रॅलीचा शुभारंभ  केला  .कार्यक्रमात युवक बिरादरी संस्थेच्या अध्यक्ष  सरिताताई फुंडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव ,यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी -कर्मचारी आणि शहरातील  विविध शाळेचे विद्यार्थी ,शिक्षक उपस्थित होते. नगरपरिषद शाळा ,पवनी ,नुतन कन्या शाळा ,भंडारा यांच्यासह अनेक शाळांतील  शेकडो विदयार्थी विदयार्थीनींनी घेतलेल्या सामुहिक प्रतिज्ञेमुळे देशभक्तीपर वातावरण झाले होते.

         जिल्हा परिषदेच्या सभागृहात  मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह त्यांच्या अधिनस्त सर्व विभागप्रमुख यांनी ही हातात दिवे घेऊन शपथ घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांच्यासह  निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी,कर्मचारी यांनी नियोजन सभागृहात पंचप्रण शपथ घेतली.