भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

भंडारा: दिनांक ०३/०८/२०२३ रोजी सकाळी ०९.३० पासुन २.२० पर्यत मधुकर बांलपांडे यांचे घरी बाजार चौक दाभा येथे भंडारा जिल्हा पोलीस विभागातर्फे गांव दत्तक योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आली. येथे मा. पोलीस अधिक्षक श्री. लोहित मतानी भंडारा, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा श्री. डॉ. अशोक बागुल, सपोनि. श्री. अभिजीत पाटील पोलीस ठाणेदार वरठी तसेच डॉ. शैलेश कुकडे व त्याची चमु यानी उपस्थितीत नागरीकांचे “संपुर्ण शारीरीक तपासणी ई. सी.जी., रक्तसाखर, रक्तदाब, ऑक्सीजन लेव्हल तपासणी व उपचार करुन ३१८ नागरीकांना चष्मे वितरण करण्यात आले. तसेच औषधी वितरण करण्यात आले.

यावेळी मा. पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित दाभा गावातील नागरीकांना आरोग्या बाबत मार्गदर्शन केले. सदर वैद्यकीय तपासणी दरम्यानं दाभा येभील सर्व प्रतिष्ठीत नागरीक असे एकुण ३५० ते ४०० गावातील हजर

होते.