आरोग्य तपासणी शिबिराचा 70 कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

आरोग्य तपासणी शिबिराचा 70 कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ

भंडारा दि. 3: आज नियोजन भवन येथील महसूल सप्ताहाअंतर्गत झालेल्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य शासकीय  कार्यालयामधील 70 अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

जिल्ह्यात महसूल सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम सध्या राबविण्यात येत असून अधिकारी- कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे, या दृष्टीने आरोग्य तपासणी सोबतच रोज सकाळी साडेपाच ते साडेसहा या दरम्यान ऑफिसर क्लब येथे योग व प्राणायामाचे वर्ग देखील घेण्यात येत आहेत.

योगा व प्राणायामाचे वर्ग 21 ऑगस्टपर्यंत सुरू असून रोज सकाळी योग साधक त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आजच्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये प्रामुख्याने बीपी, शुगर, थायरॉईड आणि अन्य आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.

या शिबिरात डॉ. भूषण फेंडर, डॉ.आस्था लांबट यांच्यासह त्यांच्या अधिनस्थ मोनाली काटवले, दिव्यश्री चव्हाण, यांच्यासह नितीन तीतरमारे यांनी या आरोग्य तपासण्या केल्यात. आरोग्य तपासणीचे रिपोर्ट संबंधित कर्मचारी -अधिकाऱ्यांना देऊन त्यानुरुप त्यांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.