सुधारीत गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या नविन सुधारीत योजनेकरीता अर्ज मागविण्यासाठी मुदतवाढ

सुधारीत गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या नविन सुधारीत
योजनेकरीता अर्ज मागविण्यासाठी मुदतवाढ

गडचिरोली, दि.02:सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजना राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रति तालुक्यातुन 1 प्रमाणे सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या योजनेसाठी पात्र गो- शाळेकडुन नव्याने अर्ज मागविण्यात आले आहे. गोवंश गोवर्धन सेवा केंद्र या योजनेअंतर्गत लाभार्थी गो-शाळेची निवड मधील वेळापत्रकामध्ये सुधारणा करण्यात आली असल्याने गोवर्धन गोवंश सेवा केंद्र निवड करण्याकरीता पात्र संस्थाकडून दिनांक 20.07.2023 ते 18.08.2023 पर्यंत अर्ज सादर करण्यात यावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली, डॉ. विलास अ. गाडगे यांनी केले आहे.