प्रवेशास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

सन 2023-24 वर्षात प्रवेशित/प्रवेशास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना

 गडचिरोली,दि.01: सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात 11वी, 12वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायीक

पाठयक्रमातील, सेवा व निवडणुकीचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक त्या दस्ताऐवजासह समितीस दिनांक 15 जुलै 2023 पर्यंत दाखल केले अशी प्रकरणे निकाली (त्रृटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत, तरी ज्या अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या ईमेल. आय. डी. वर आजपर्यंत प्राप्त झालेले नाही, अशी सर्व प्रकरणे त्रृटीत असल्याने अर्जदारानी कार्यालयीन वेळेत (शासकिय सुटटी चे दिवस वगळून) मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे. सदर त्रृटीची पुर्तता न केल्यास MH-

CET, JEE, NEET, B.ED CET, M.ED CET, LLB CED, B.SC AGRI CET, व MBA CET या सारख्या व्यावसायीक पाठयक्रमात राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे आरक्षित जागेवर राखीव प्रवर्गातून प्रवेश न झाल्यास सर्वस्वी जबाबतदारी ही अर्जदाराची राहील.

तसेच 11वी,12वी विज्ञान शाखेतील विद्यार्थांनी जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेणे चालू आहे, तरी सर्व अर्जदारांनी कार्यालयामध्ये प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन उपायुक्त देवसूदन ना. धारगावे यांनी केले आहे.