आरमोरी तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन

आरमोरी तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेबाबत जाहीर आवाहन

गडचिरोली,()दि.29: आरमोरी तालुक्यातील पेसा क्षेत्रातील मौजा- चिचोली व लोहारा आणि नॉन पेसा क्षेत्रातील मौजा-शेगांव साझा या तीन रिक्त झालेल्या कोतवाल पदाची भरतीची प्रक्रिया सुरु करण्यांत आलेली आहे. भरती प्रक्रियेसंदर्भात विस्तृत माहितीसाठीचा जाहिरनामा संबंधित गावाचे चावडी/मंडळ अधिकारी/तलाठी/ग्रामपंचायत/पंचायत समिती/ नगरपरिषदेच्या तसेच तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर दिनांक 31.07.2023 रोजी प्रसिद्ध करण्यांत येणार आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्यांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे सादर करावे. असे आवाहन आरमोरीचे तहसिलदार श्रीहरी माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.