कमलापुर ल. पा. तलाव, 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

कमलापुर ल. पा. तलाव, 100 टक्के भरल्याने तलावालगतच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा

गडचिरोली, दि.24: कमलापुर ल. पा. तलाव मु .पो.- कमलापुर तालुका- अहेरी, जिल्हा- गडचिरोली दिनांक 23/07/2023 ला सकाळी 6.00 वा. 100 टक्के भरलेला आहे. तरी तलावाच्या काठी असलेल्या व तलावाच्या सांडव्यालगत असलेल्या सर्व नागरीकांना उचित सतर्कता बाळगणे संदर्भात सावधानतेचा इशारा देण्याची विनंती करण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, चामोर्शी यांनी कळविले आहे.