डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रस्ताव सादर करावे
गडचिरोली, दि.21: राज्यातील मदरसा आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा पायाभुत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान ही योजना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसानी शासनमान्य खाजगी शाळा, अपंग शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थानी त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असुन सदरबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दि. 10 ऑगस्ट, 2023पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवुन अंतिमरित्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणा-या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.